मणिरत्नमच्या चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री

    दिनांक :16-May-2019
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने ‘फन्ने खान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनर्पदार्पण केले. या चित्रपटानंतर ऐश्वर्या आता खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये सक्रीय झाली आहे. आता ती लवकरच दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटामध्ये झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
 
 
माहितीनुसार, मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटामध्ये ऐश्वर्या झळकणार आहे. हा चित्रपट ऐतिहासिक कादंबरी ‘पोन्नियिन’वर आधारित आहे. या चित्रपटामध्ये चोळ साम्राज्यावर भाष्य करण्यात येणार आहे. यामध्ये ऐश्वर्या नंदिनी ही व्यक्तीरेखा साकारणार असून नंदिनी ही पेरिया पझुवेत्तारय्यर यांची पत्नी होती. तिने चोल साम्राज्याच्या चान्सलर आणि खजिनदार पदाची जबाबदारी पार पाडली होती. या वर्षांच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.