या दोन गोष्टींची किंमत मोजावीच लागते : अमिताभ बच्चन

    दिनांक :16-May-2019
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकाच वावर आहे. ट्विटरवर ते सर्वाधिक सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातून ते विविध घडामोडींवर त्यांचं मत व्यक्त करत असतात. तर कधी कधी सोशल मीडियावर त्यांना आवडलेल्या गोष्टीसुद्धा ते शेअर करतात. बिग बींनी ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट लिहिली असून त्या पोस्टद्वारे त्यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
 

 
‘किंमत दोन्ही गोष्टींची मोजावी लागते, बोलण्याची पण आणि मौन बाळगण्याची पण,’ असं ट्विट त्यांनी केलंय. यासोबतच त्यांनी सोशल मीडियाबाबत सूचक वाक्य लिहिलं आहे. ‘सोशल मीडिया की पहचानी है, जानी मानी कहानी है,’ असं त्यांनी लिहिलंय. सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीबाबत मत व्यक्त करणं किंवा त्याबाबत मौन बाळगणं, या दोन्ही गोष्टींची किंमत मोजावी लागते असं बिग बींनी म्हटलंय.