अँटोनी ग्रीझमन अॅॅटलेटिको माद्रिद सोडणार

    दिनांक :16-May-2019
माद्रिद,
 
या मोसमाच्या अखेरीस फ्रान्सचा आक्रमक फुटबॉलपटू अॅण्टोनी ग्रिझमन अॅटलेटिको माद्रिद क्लब सोडणार असल्याची माहिती स्पॅनिश क्लबने ट्विटरवरून दिली. 28 वर्षीय ग्रिझमॅनचा अॅटलेटिको सोबतचा करार 2023 सालापर्यंत आहेे, परंतु त्याने पुढील मोसमात मी क्लबमध्ये राहणार नाही असे क्लबला कळविल्याचे क्लबने ट्विटरवर सांगितले आहे. काही क्षणांनी त्याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला.
 
 
 
प्रशिक्षक दिएगो सायमन व मिग्यूएल अँजेल यांच्याशी बोलल्यानंतर मी आता तुमच्याशी बोलू इच्छित आहे. तुम्ही चाहत्यांनी माझ्यावर खूप खूप प्रेम केले. मी अॅटलेटिको माद्रिद क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी येथे पाच रोमांचकारी मोसम खेळलो. तुम्ही सर्व (चाहते) माझ्या हृदयात सदैव राहाल, असे 2018 सालच्या विश्वविजेत्या फ्रांस संघाचा खेळाडू ग्रिझमन म्हणाला. या व्हीडिओमध्ये ग्रिझमनने काळ्या रंगाची टी-शर्ट परिधान केली होती व त्याच्या पार्श्वभागी पांढरा पडदा होता.