'मँगो मस्तानी'

    दिनांक :16-May-2019
प्रमोदिनी निखाडे
7709825547
 
भारतातील रूचकर पौष्टिक खाद्यपदार्थ नेहमीच जगाच्या आकर्षणाचे केंद्र्र राहिलेले आहे. चव, पौष्टिकत्व, जीवनसत्वे यांचा अप्रतिम मेळ आपल्याला भारतीय खाद्यसंकृतीमध्ये दिसून येतो. मात्र यात अपवाद वा सत्यता अशी आहे की- तरुण पिढी पौष्टिक आहाराला दुर्लक्षित करून जंकफुडच्या जाळ्यात गुरफटलेली आहे. पारंपरिक पदार्थांचेे सेवन करणे कमीपणाचे वाटायला लागले आहे. ही मानसीकता समाजात दिसून येते आहे, ती तुम्ही-आम्हीच वाढवतो आहे, यात दृप्राय नाही. आकर्षक पॅकिंगला बळी न पडता गुणवत्तेला वाव देणे, आज काळाची गरज आहे. 
 
 
प्लॅस्टिकच्या वाढत्या घनकचर्‍याच्या जागतिकतेला आज आपण सामोरे जात आहे. याच अल्पशा जाणवणार्‍या सवयीचे मूळ आहे, यात शंका नाही. आरोग्यास हानिकारक कोलड्रिंक्सचे व्यवसाय दिमाखात सुरू आहेत वाढत्या गरमीच्या पार्‍यामध्ये शरीराला तरलता प्रदान करणारे शीतपेय निवडताना आरोग्यास गुणकारी पेय निवडणे, पिणे आवश्यक आहे. या अनुषंगाने विभिन्न प्रकारच्या शीतपेयांच्या पारंपरिक खजिन्यातील मस्तानीच्या ग्रीष्मकालीन पेयाबाबत जाणून घेऊया.
 
सर्वप्रथम ‘मस्तानी’ हे पेय पुणे शहरात नावारूपास आहे. पुण्यातील गुजर नावाच्या गृहस्थाने १९२३ च्या सुमारास ‘मस्तानी’ पेयाला व्यवसायिक स्तरावर सुरू केले. विविध फळांचे रस, फळांचे काप यांचा योग्य मेळ साधून पिता-पिता खाता येणारे ‘मस्तानी’ पेय बाजारात आणले. मात्र मस्तानी या पेयास प्रसिद्धी दिली ती फळांच्या राजाने! हापूस आंब्याच्या गरापासून तयार होणारी ‘मँगो मस्तानी’ पुणेकरांच्या जिभेला रुजली आणि आज ती जगप्रसिद्ध आहे.
 
सुजाता मस्तानी, खत्री बंधूंचे आईसक्रिम, मस्तानी पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. यामध्ये रोज मस्तानी, चॉकलेट मस्तानी, मँगो मस्तानी, खस मस्तानी, स्ट्रॉबेरी मस्तानी, बटरस्कॉच मस्तानी, सीताफळ मस्तानी इत्यादी अनेक मस्तानीचे फ्लेवर आपल्याला चाखायला मिळते. पुण्यातील विविध भागांंमध्ये यांच्या फ्रेंचायसी थाटात सुरू आहे. व्यावसायीक दृष्ट्या नावारूपास आलेली ‘मँगो मस्तानी’ घरी देखील तयार करता येते.
 
तर जाणून घेऊया याची कृती:
मूळ स्वरूपाची मँगो मस्तानी तयार करण्याकरिता अर्धा किलो हापूस आंब्याचा गर असल्यास, दोन चमच कॉर्नलॉवर, अर्ध्या किलो गराला 200 ते 250 ग्रॅम क्रेशफ्रम, चवीनुसार साखर, एक कप पाणी या साहित्यांना मिक्सरमध्ये एकत्र करून फिरवून घेऊन आईसस्क्रिम स्कुप आणि सुखे मेवे घालून सर्व्ह करा- मँगो मस्तानी!
 
(टीप : पाण्याऐवजी आपण दूध सुद्धा घालू शकतो पण त्याने मस्तानीचा रंग फिका होतो. कॉर्नफ्लॉवर आवडीवर आहे, यामुळे मस्तानीला स्मुथनेस येतो)
 
पुण्याचा शनिवार वाडा आणि बाजीराव मस्तानी प्रत्येकाच्या काळजात घर करणारा इतिहासाचा अनमोल ठेवा आहे. यातूनच मस्तानी पेयाची संकल्पना आली असावी, भावी बाजीराव किंवा मस्तानीच्या हृदयाच्या ठोका चुकवून त्याच्या काळजात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात, तर या तापत्या वातावरणात त्याच्या पोटाची काळजी घेत घ्या, थंडगार मस्तानीचा आस्वाद!