नथुरामसंबंधीच्या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही; साध्वीला मागावी लागेल माफी

    दिनांक :16-May-2019
नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहिल, भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल. असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी म्हटले आहे.
 

 
 
 
 
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने नथुराम बद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय पक्षांकडून भाजपावर टीका होऊ लागल्यानंतर भाजपा प्रवक्ते नरसिंहाराव यांनी असे सांगितले आहे.