मालगाडीचे इंजिन १४ डबे सोडून पुढे धावली !

    दिनांक :16-May-2019
नाशिक,
नाशिकमध्ये आज दुपारी मोठी दुर्घटना टळली आहे. कपलिंग तुटल्याने मालगाडीचे इंजिन १४ डबे सोडून पुढे धावले. सुदैवाने मालगाडीचे डबे रुळावरून खाली आले नाहीत. नाही तर मोठा अनर्थ घडला असता असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 
आज दुपारी मनमाड-नांदगाव दरम्यान ही घटना घडली. या मार्गावरून जात असलेल्या मालगाडीचे कपलिंग तुटल्याने इंजिन सहा डबे पुढे गेले. त्यामुळे मालगाडीचे १४ डबे मागेच राहिले. सुदैवाने मालगाडीचा वेग कमी होता आणि मालगाडी रुळावरून खाली घसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.