आजचे राशी भविष्य, दि. १६ मे २०१९

    दिनांक :16-May-2019
मेष - बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे. करियरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्या आत्मविश्वासामुळे जोखीम असणाऱ्या कामातही यश मिळेल. पैसे आणि व्यवसायातील गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. सामाजिक सन्मान वाढेल. कौटुंबिक संबंधांमध्ये सुधारणा होतील. तब्येतीकडे लक्ष द्या. खर्च वाढू शकतो.
वृषभ - ऑफिसमध्ये काम अधिक राहील. काही लोक तुमच्याकडून काम काढून घेऊ शकतात. सावध राहा. काही मानसिक गोष्टींमुळे कामात लक्ष देणे कठीण होईल. अधिक विचार करु नका. तुमच्या मनातील गोष्टी जोडीदारापासून अजिबात लपवू नका. लहान समस्या जाणवतील.
मिथुन - नोकरी, व्यवसायात कुटुंबाची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी विचार करुन बोला. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. घरात उपयोगाची वस्तू आणू शकता. सकारात्मक विचार ठेवा. विश्वासू व्यक्तीची मदत होऊ शकते. जोडीदार संवेदनशील राहील. तुमच्या भावनांचा सन्मान होईल. तब्येतीकडे विशेष लक्ष द्या.
कर्क - नवीन व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. एखादी जुनी योजना अचानक आठवणीत येऊ शकते, त्यावर काम करण्याचा प्रयत्न कराल. व्यवहारकुशलतेमुळे अधिकाऱ्यांकडून सन्मान मिळेल. तब्येतीत सुधारणा होईल. जुने आजार दूर होतील.
सिंह - व्यवसायात नवीन योजना होऊ शकतात. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. उधार पैसे घ्यावे लागू शकतात. तुमचे प्रयत्न सफल होतील. ऑफिसच्या कामासाठी प्रवास होऊ शकतो, तुमच्यासाठी हा प्रवास फायद्याचा ठरु शकतो. जोडीदाराची मदत मिळेल. आज तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे. विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
कन्या - नोकरी, व्यवसायातील निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. वाद होऊ शकतो. कुटुंबातील समस्या सुरुच राहतील. मानसिक त्रास होऊ शकतो. जवळच्या संबंधांमध्ये अचानक बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तणाव वाढू शकतो. वाहन चालवताना सावध राहा.
तुळ - कर्जमुक्त व्हाल. तुमच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्या. अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. आज एखादी योजना बनवणे तुमच्यासाठी मेहनत करण्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरेल. कुटुंब, जमिनीबाबतच्या गोष्टी, मित्र आणि नातेवाईक अधिक खास वाटतील. जोडीदाराला खुश कराल. काही नवीन आणि सकारात्मक काम कराल तर जीवनात चांगले बदल, सुधारणा करु शकता.
वृश्चिक - व्यवसाय उत्तम राहील. एखादं खास काम पूर्ण होऊ शकतं. भौतिक सुख-सुविधांकडे तुमचा कल राहील. वैयक्तिक समस्या मार्गी लागतील. गुंतवणूकीची योजना आखू शकता. अचानक भेटणारी व्यक्ती किंवा अचानक होणाऱ्या एखाद्या गोष्टीमुळे फायदा होईल. आराम मिळेल.
धनु - नोकरीत बढतीची शक्यता आहे. स्वत:चा एखादा व्यवसाय असल्यास त्याकडे लक्ष द्या. नोकरी, व्यवसायातील समस्या कमी होतील. धावपळ कमी होईल. दिवस चांगला आहे. घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी आनंदाचं वातावरण राहील. प्रेमसंबंध आणि वैवैहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. थकवा, तणाव कमी होईल.
मकर - आर्थिक गोष्टींमध्ये सुधारणा होईल. नवीन ओळखीमुळे फायदा होईल. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत मनासारखी बढती होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीबाबत सावध राहा.
कुंभ - व्यवसायात आत्मनिर्भरता राहील. नवीन लोकांशी ओळखी होतील. काम वाढेल. सोबत असणाऱ्या लोकांची मदत होईल. नवीन लोकांशी संबंध चांगले राहतील. बेरोजगार लोकांना नोकरी मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. विचार केलेली कामं वेळेत पूर्ण होतील. जुन्या समस्या मार्गी लागू शकतात.
मीन - बोलण्यावर ताबा ठेवा. अनियमित दिनचर्येमुळे आळस आणि थकवा वाटू शकतो. कामात समस्या जाणवतील. तुमच्या उत्पन्नानुसारच खर्च करा. आत्मविश्वास नियंत्रणात ठेवा. एखाद्या गोष्टीवर बैचेनी जाणवेल. उत्साहात नवीन गुंतवणूक करु नका. तब्येत ठिक राहील.