‘कसौटी जिंदगी की २’मध्ये होणार मिस्टर बजाजची एंट्री

    दिनांक :16-May-2019
छोट्या पडद्यावरील ‘कसौटी जिंदगी की २’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. कोमोलिका, प्रेरणा आणि अनुराग यांच्यानंतर आता या मालिकेमध्ये बहुप्रतिक्षीत ठरलेल्या मिस्टर बजाज यांची एण्ट्री होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मिस्टर बजाज यांच्या भूमिकेत नक्की कोणत्या कलाकाराची वर्णी लागेल यावरुन चर्चा सुरु होती. मात्र आता या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.
 

 
‘पिंकव्हिला’च्या माहितीनुसार, मिस्टर बजाज यांची भूमिका अभिनेता करणसिंह ग्रोवर निभावणार आहे. ‘कसौटी जिंदगी की २’ मध्ये रोनित रॉय यांनी मिस्टर बजाज ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागात करणसिंह ग्रोवरची वर्णी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
एकता कपूरने मिस्टर बजाज यांच्या भूमिकेसाठी करणला विचारणा केली असून त्याने त्याचा होकार कळविला आहे. येत्या १७ मे पासून या मालिकेच्या पुढील भागाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक काळापासून लांब असलेला करण या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. यापूर्वी करणने ‘दिल मिल गए’ आणि ‘कुबूल है’ या दोन सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे.