वर्धा : विहिरीत पडला बिबट्या

    दिनांक :16-May-2019
 

 
 
वर्धा: जिल्ह्यातील तळेगाव वनपरिक्षेत्र कार्यालया च्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या सिंदि वीहीरा या भागातील जंगलालागत असलेल्या एका शेतीतील विहिरीत बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रात्री च्या सुमारास सावजाच्या मागावर असताना हा बिबट चुकुन विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत असुन सकाळपासून वनविभाग व रेस्क्यु टिम या बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे.परंतु हा बिबट खुपच चपळ असल्याने त्याला काढण्यासाठी विहिरीत टाकलेल्या पिंजऱ्यात तो येण्यासाठी हुलकावणी देत आहे.अद्यापपर्यंत या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाला यश आले नसले तरी स्पपूर्ण वनविभागाची टिम त्याला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे.