मारिया शारापोव्हाची फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार

    दिनांक :16-May-2019
दोन वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शारापोव्हाच्या खांद्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती, मात्र या दुखापतीमधून शारापोव्हा अजुनही सावरली नाहीये. अखेरीस तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
 
 

 
 
“आयुष्यात योग्य निर्णय घेणे नेहमी सोपे नसते. मी सरावाला सुरुवात केली आहे. हळूहळू खांद्याची दुखापत बरी होते आहे. पण पूर्णपणे सावरण्यासाठी मला थोडा अजून कालावधी लागेल.” शारापोव्हाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना संदेश दिला.