नथुराम गोडसे हा देशभक्त होता : साध्वी प्रज्ञा

    दिनांक :16-May-2019

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिले जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे.
 
 
 
भोपाळमधून साध्वी प्रज्ञा या निवडणूक लढवत आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले आहे. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे म्हटले होते. त्यानंतरही वाद निर्माण झाला होता. नथुरामबाबत प्रश्न विचारला असता प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामला देशभक्त म्हटलं आहे.