गोल्डन स्टेटच्या विजयात स्टीफन करी चमकला

    दिनांक :16-May-2019
न्यू यॉर्क,
स्टीफन करीच्या शानदार 36 गुणांच्या जोरावर गोल्डन स्टेड वॉरियर्सने एनबीए वेस्टर्न कॉन्फरन्स फायनल्स सीरिज सामन्यात पोर्टलॅण्ड ट्रेल ब्लेझर्स संघावर 116-94 अशा गुणफरकाने दणदणीत विजय नोंदविला.
 
 
 
स्टीफनने सात बास्केट करण्यासही संघमित्रांना मदत केली. सुपर स्टार केव्हिन दुरांतच्या अनुपस्थितीत क्ले थॉम्पसनने 26 गुणांची भर घातली. तसेच ड्रायमंड ग्रीनने 12 गुण नोंदविले. स्टीफनचा भाऊ सेठ करी हा पोर्टलॅण्ड ट्रेल ब्लेझर्सकडून खेळत होता, मात्र सेठ आपल्या संघासाठी केवळ तीन गुणांची नोंद करू शकला. पोर्टलॅण्डकडून डॅमियन लिलार्डने सर्वाधिक 19 गुण नोंदविले व त्याने सहा बास्केट करण्यात सहकार्य केले.