स्टीमॅकच्या अनुभवाचा लाभ होईल: छेत्री

    दिनांक :16-May-2019
नवी दिल्ली, 
क्रोएशियाचा विश्व फुटबॉलपटू इगोर स्टीमॅक यांच्या अनुभवांचा भारतीय फुटबॉल संघाला लाभ होईल, असे म्हणत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने स्टीमॅक यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
 

 
 
फुटबॉलमधील मोठ्या पातळीवर प्रशिक्षण करणारे स्टीमॅक यांच्याकडून आम्हाला मोलाचे धडे मिळतील. हे धडे गिरवून आम्ही उत्कृष्ट कामगिरी करू. आम्ही सध्या आपल्या शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्यास सुरुवात केलेली आहे, असे भारताकडून 100च्या वर आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा छेत्री ट्विटरवरून म्हणाला.