शेतकऱ्यांबाबत बँका असंवेदनशील : विजय काटोले

    दिनांक :17-May-2019
तभा ऑनलाईन टीम,
शेगांव तालुक्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे, त्यात शेतकरी होरपळुन निघत आहे. त्यांना सहानुभुती दाखवण्याऐवजी स्टेटबँक प्रशासन अत्यंत असंवेदनशिल वागत आहे, असा गंभीर आरोप शेगांव तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विजय काटोले यांनी आज केला. 
 
 
शेगांवमधील स्टेटबँकेसमोर त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलनात ते सहभागी झाले होते. यावेळी तरुण भारतशी बोलताना ते म्हणाले की, पाण्यावाचून ग्रामीण शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रचंड हाल होत आहेत, तशातच पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होईल, त्याआधी पेरणीसाठीचे बी-भरण करावे लागते त्यासाठी आर्थिक तजवीज करावी लागते, परंतू पिक कर्जाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. मात्र मागील वर्षापासुन स्टेटबँक शेतकऱ्यांसोबत असंवेदनशील वागून राहीली आहे, त्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्ष शेगांव तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना हिंमत देण्यासाठी व स्टेटबँकेचा कारभार वठणीवर आणण्यासाठी आम्ही एकदिवसीय धरणे आंदोलने करत असल्याचे त्यांनी सागितले.
 
पिक विम्याचे पैसै व सरकारकडुन मिळणारी इतर कोणतीही मदत कर्ज खात्यात वळती करु नये अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.