रोईंगपटूच्या विरोधात गुन्हा दाखल, शारीरिक व मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप

    दिनांक :17-May-2019
नाशिक,
 
राष्ट्रीय रोईंगपटू आणि लष्कराचा जवान दत्तू भोकनळविरोधात फसवणूक तसंच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.
 
 
 
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "2015 मध्ये दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्याने चांदवडमध्ये गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख होऊन मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यालयात हिंदू पद्धतीने लग्न केले. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करता काही दिवसांनी दोघांकडच्या नातेवाईकांसमक्ष गावी लग्न करायचे  आम्ही ठरवले.
 
मात्र त्यानंतर आम्ही लग्न करणार असे आमच्या घरी सांगितले. दोन वेळा लग्नाची तारीख ठरवून कार्यालय बुक करुनही, दत्तूने ऐनवेळी नकार दिला. त्याने मला 22 डिसेंबर 2017 ते 3 मार्च 2019 या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास देत माझी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे लग्नाबाबत विचारल्यास मी विष पिऊन आत्महत्या करेन, अशी धमकीही दत्तूने मला दिली."