कॅलिफोर्नियात एफ १६ लढाऊ विमान गोदामावर कोसळले

    दिनांक :17-May-2019
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात एफ १६ हे लढाऊ विमान गोदामावर कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत वैमानिक सुरक्षित असून गोदामात सुदैवाने कर्मचारी उपस्थित नसल्याने अनर्थ टळला आहे.
 
 
 
 
 
 
 
दक्षिण कॅलिफोर्नियातील हवाई दलाच्या तळाजवळील गोदामावर एफ १६ हे लढाऊ विमान कोसळले. प्रशिक्षणासाठी हे विमान झेपावले होते. वैमानिक विमान कोसळण्यापूर्वी पॅराशूटच्या साह्याने बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले आहे. विमान ज्या गोदामावर कोसळले त्या गोदामातही दुर्घटनेच्या वेळी कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
विमान कोसळल्यानंतर आगही लागली. मात्र, आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले. विमान का कोसळले, याची चौकशी सुरु असून वैमानिकाला काही दुखापत झाली आहे का, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास (स्थानिक वेळेप्रमाणे) ही दुर्घटना घडली. विमान कोसळले त्यावेळी गोदामाजवळ एक व्यक्ती होता. “बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज आला. सुरुवातीला नेमके काय घडले हेच कळले नाही. मात्र काही वेळात विमान गोदामावर कोसळल्याचे लक्षात आले. भयावह अनुभव होता”, असे त्या व्यक्तीने सांगितले.