वर्धा जिल्ह्यातील नव्या कामांना जलसंधारण मंडळाची मान्यता

    दिनांक :17-May-2019
-खा. तडस यांची माहिती 

 
 
तभा ऑनलाईन टीम, 
वर्धा,
वर्धा जिल्हात 100 हेक्टर पर्यंत सिंचन क्षमतेच्या एकूण २४ कामांकरिता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून सर्व कामे वेळेत पुर्ण करण्याकरिता व या कामांचा लाभ लवकरात लवकर शेतकऱ्यांना व जनतेला मिळावा म्हणुन जिल्हा प्रशासनाने दुष्काळीची परिस्थिती लक्षात घेता प्राधान्याने नियोजन करावे अशा सुचना खासदार रामदास तडस यांनी वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.
 
महामंडळाच्या वतीने प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सर्व २४ कामांची एकूण अंदाजित किंमत २० कोटी ८ लक्ष, निर्धारित केली  आहे. वर्धा जिल्हयातील दुष्काळी परिस्थीती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्व कामे नियोजीत वेळेत पुर्ण केल्यास या जलसंधारणाच्या कामाचा लाभ जिल्हयातील शेतकरी वर्ग व जनसामान्यांना होणार आहे. या करिता सर्वांनी सहकार्याची भावना ठेवून कार्य करावे असे मत खा. तडस यांनी यावेळी व्यक्त केले.