पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात 'हा' गोलंदाज परतला

    दिनांक :17-May-2019
लाहोर, 
पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या वर्ल्ड कप संघात डावखुरा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरचा समावेश केला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत ते 0-2 असे पिछाडीवर आहेत. तिसऱ्या वन डे सामन्यात 358 धावांचा डोंगर उभा करूनही पाकिस्तानला हार मानावी लागली. इंग्लंडने 6 विकेट आणि 31 चेंडू राखून हे लक्ष्य सहज पार करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीची मर्यादा उघड केल्या.
 

 
मोहम्मद आमीर गेल्या काही सामन्यांत कामगिरीशी झगडत होता, त्यामुळे पाकिस्तानी निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. पण, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. आमीरच्या समावेशामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजीला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमीरला कांजण्या झाल्या असून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर, कर्णधार सर्फराज अहमद आणि निवड समिती प्रमुख इंझमान-उल-हक यांना आमीर वेळेत बरा होईल, अशी आशा आहे.