मलायका 'दबंग-३’मधून बाहेर, 'या' अभिनेत्रीची एन्‍ट्री

    दिनांक :17-May-2019
मुंबई,
 
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-३ची सध्‍या चर्चा होताना दिसतेय. दबंग हा चित्रपट २०१० रिलीज झाला होता. आता दबंग सीरिजचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्‍ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा मुख्‍य भूमिकेत असणार आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, चित्रपटात मलायका अरोराचे कुठलेही गाणे, आयटम नंबर नसणार आहे. आता मलायकाची जागा 'गोल्‍ड' अभिनेत्री मौनी रॉय घेणार असल्‍याचे समजते. परंतु, चित्रपटाच्‍या टीमकडून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.
 

 
मौनीने गोल्‍ड चित्रपटात अक्षय कुमारसोबत मुख्‍य भूमिका साकारली होती. रिपोर्टनुसार, मौनीच्‍या या गाण्‍याचे शूटिंग पुढील आठवड्‍यात वसई स्टुडिओमध्‍ये करणार आहे.