विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल

    दिनांक :17-May-2019
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची सुरवात इंग्लंडमध्ये होणार आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज या स्पर्धेसाठीच्या बंपर बक्षिसांची घोषणा केली आहे. विश्वचषक विजेत्या संघाला यंदा तब्बल ४० लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षिस घोषित करण्यात आले आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे किंमत २८ कोटींच्या रुपयात) याचसोबत उप-विजेत्या संघाला २० लाख डॉलर्सचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
 
 
विजेतेपदासाठी घोषणा करण्यात आलेली बक्षिसाची रक्कम ही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वाधिक रक्कम मानली जात आहे. याचसोबत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला ८ लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.