जांभुळखेडा हल्ल्याची जबाबदारी नक्षलवाद्यांनी स्वीकारली

    दिनांक :17-May-2019

 
 
गडचिरोली : १ में महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतल्या जांभुळखेडा जवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान व एक खासगी वाहन चालक शहीद झाले. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच पत्रक काढून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पत्रकात त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेचा निषेध केला आहे.
कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील २७ वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली होती. याची माहिती मिळताच शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी जात असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधला होता. नक्षलवाद्यांच्या पत्रकात नक्षलवाद्यांविरोधी कारवायांमुळेच जांभुळखेडा जवळ भूसुरुंग स्फोट घडवून आणल्याचे म्हटले आहे. तसेच १९ मे राजी बंदचे आवाहन केले आहे.