लाखो रुपयांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त

    दिनांक :17-May-2019
 नगर: मुदतबाह्य झालेले कीटकनाशके पुन्हा बाजारात विकण्याचा प्रयत्न होत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगर येथील बाजारपेठेतील पृथ्वी ग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर धाड घालून मोठ्या प्रमाणात कीटकनाशके जप्त केली. ही कारवाई आज सायंकाळी चार वाजता करण्यात आली.
 

 
 
मुदतबाह्य झालेले कीटकनाशकांवरील वेष्टण बदलून त्यावर नवे वेष्टण लावण्याचा प्रकार पृथ्वी ग्रो सर्व्हिसेसच्या गोदामांमध्ये होत होता. एका गुप्त माहितीवरून कृषी विभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा मारला असता गोदामांमध्ये साठवलेली मुदतबाह्य कीटकनाशके आढळून आली. त्या कीटकनाशकावरील वेष्टण बदलून तेथे नवे वेष्टण लावण्यात येत असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने जप्त केलेल्या साहित्यांत नव्याने तयार करण्यात आलेले वेष्टण, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर आदींचा समावेश आहे. जप्त केलेला मुदतबाह्य कीटकनाशकांचा मुद्देमाल लाखो रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे.