मालेगाव स्फोटातील आरोपींनी आठवड्यातून एकदा हजर व्हावे - विशेष न्यायालयाचे आदेश

    दिनांक :17-May-2019
मुंबई: मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालय करीत असून, साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सातही आरोपींनी आठवड्यातून एकदा सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने आज शुक्रवारी दिले आहेत.
 

 
 
सुनावणीदरम्यान आरोपी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाचे न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी हे आदेश दिले आहेत. सबळ कारणाअभावी अनुपस्थित राहण्याची परवानगी नाकारली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या न्यायालयात या प्रकरणी साक्ष नोंदवल्या जात असून, पुढील सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर यांच्याव्यतिरिक्त सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुळकर्णी या प्रकरणात आरोपी आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन दिला आहे. दहशतवादी कृत्य, गुन्हेगारी कट रचणे आणि हत्येच्या आरोपाखाली न्यायालयाने सातही आरोपींवर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे.