‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर सयाजी शिंदेंची उपस्थिती

    दिनांक :17-May-2019
सोनी टीव्हीवर ‘कोण होणार करोडपती’चे  नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीच्या या पर्वाचे सूत्रसंचालन ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हजेरी लावली असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 

 
 
 
सयाजी शिंदे सेटवर फक्त भेट द्यायला आले होते की ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नागराज यांना प्रेक्षकांनी पाहिले  आता सूत्रसंचालक म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाइफलाइन्स असतील हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. ‘कोण होणार करोडपती’चा पहिला भाग येत्या २७ मे रोजी रात्री ८.३० वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.