‘नेटफ्लिक्स’वरील टॉक शोमध्ये दिसणार 'हा' भारतीय अभिनेता

    दिनांक :17-May-2019
‘नेटफ्लिक्स’वरील डेव्हिड लेटरमॅनच्या टॉक शोमध्ये बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान सहभागी होणार आहे. शाहरुखने नुकतंच न्यूयॉर्कमध्ये या टॉक शोसाठी शूटिंग पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे डेव्हिडच्या ‘माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन’ या टॉक शोमध्ये सहभागी होणारा शाहरुख पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. याआधी बराक ओबामा, जॉर्ज क्लूनी, मलाला युसूफझई आणि जेरी सीनफेल्ड यांसारखे दिग्गज या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
 

 
शाहरुखने ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून डेव्हिडसोबतचा फोटो शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. ‘बॅटमॅन आणि स्पायडरमॅन यांच्याही आधी आहेत लेटरमॅन. तुम्हाला मुलाखत देताना अनुभव वेगळाच होता. ही मुलाखत माझ्याबाबत होती म्हणून नाही तर मी जसा आहे तसा त्यामध्ये बोलू शकलो म्हणून तुमचे आभार. तुम्ही प्रेरणादायी आहात सर,’ अशा शब्दांत शाहरुखने त्याच्या भावना व्यक्त केल्या.