टायगर वूड्‌स पीजीए स्पर्धेत परतला

    दिनांक :17-May-2019
न्यू यॉर्क,
बेथपेज ब्लॅक येथील पीजीए स्पर्धेत न खेळण्याच्या उशिराने घेतलेला निर्णय टायगर वूड्‌सने फिरवला असून, सरावानंतर त्याने या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. टायगर बुधवारी झालेल्या सरावात सहभागी झाला होता. मात्र, त्याने सरावापूर्वी त्याच्या सहभागाबाबत कोणतीही माहिती न दिल्याने उत्कंठा वाढली होती.
 
 
 
त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. ती दुखापत वाढल्याने तो स्पर्धेतून माघार घेत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, तो तंदुरुस्त आहे आणि या स्पर्धेत खेळणार असल्याचे त्याच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केले. मास्टर्स स्पर्धा ही त्याच्यासाठी महत्त्वाची होती. या स्पर्धेत त्याने विजय मिळवला होता. त्याच्यासमोर गतविजेता बुक्स कोएपकाचे आव्हान आहे.