21 वर्षे गट भारतीय हॉकी संघ जाहीर

    दिनांक :17-May-2019
- स्पेनमध्ये होणार स्पर्धा
 
नवी दिल्ली, 
 
स्पेनमध्ये 21 वर्षांखालील होणार्‍या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 10 जूनपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेमध्ये नेदरलॅण्ड, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलण्ड हे महत्त्वपूर्ण संघ सहभागी होणार आहेत. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व मनदीप मोर करणार असून, सुमन बेक संघाचा उपकर्णधार आहे.
 

 
 
प्रशांत कुमार चौहान आणि पवन यांच्या रूपात दोन गोलरक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. या स्पर्धेमुळे त्यांचा अनुभव आणखी वाढेल. स्पेनमधील स्पर्धेत बलाढ्य संघ सहभागी होत असल्याने ही स्पर्धा चुरशीची ठरेल, असे कामगिरी आढावा विभागाचे संचालक डेव्हिड जॉन यांनी सांगितले.
भारतीय संघ
 
गोलरक्षक:  प्रशांत कुमार चौहान, पवन.
 
बचाव फळी:  मनदीप मोर (कर्णधार), प्रतीप लाकडा, संजय, आकाशदीप सिंह  (ज्युनियर), सुमन बेक (उपकर्णधार) परमनप्रीत सिंह.
 
मधली फळी:  यशदीप सिंह, विष्णुकांत सिंह , रविचंद्रिंसह मोयरांगथााम, मिंणदरिंसग, विशाल अंटिल.
 
आक्रमक फळी :  अमनदीपिंसग, राहुल कुमार राजभर, शिवम्‌ आनंद, सुदीप चिरमाको, प्रभज्योतिंसग.