विनयभंग केल्याप्रकरणी तीन युवकावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल

    दिनांक :17-May-2019
मालेगाव : शहरातील एका संगणक क्लास वरून घरी जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करून हातवारे करीत अश्लील हावभाव करून छेड काढल्याप्रकरणी शहरातील तीन युवकावर पोस्को कलमांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याची घटना काल
दिनांक १६ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली.
 

 
 
याबाबत यातील पीडित मुलीने मालेगाव पोलीस स्टेशन दाखल केलेल्या फिर्यादी यामध्ये नमूद केले की, संगणक क्लास करून मैत्रिणी सोबत घरी परत जात असताना शिव चौक ते मधुर कॉम्प्लेक्स दरम्यान यातील आरोपी गणेश सुनील आढाव, अर्जुन रामदास शिंदे व कृष्णा गायकवाड या युवकांनी प्लेजर स्कूटी क्रमांक एम एच ३७ के ७२१९ या गाडीने पाठीमागे येऊन अचानक समोर गाडी लावून त्याच्या समोरून गाडी फिरवली व फिर्यादी व तिच्या मैत्रिणी ला उद्देशून शिट्ट्या वाजवून अश्लील हातवारे करून फिर्यादीच्या व तिच्या मैत्रिणीच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गणेश सुनील आढाव, अर्जुन रामदास शिंदे व कृष्णा गायकवाड तिघे राहाणार मालेगांव या युवकाविरुद्ध अप. क्रमांक १६३ /१९ कलम ३५४ अ ३५४ ड ५०९ भादवि तसेच आठ बारा लैंगिक अत्याचार विरोधी कायदा पोस्को नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि. नम्रता राठोड करीत आहेत.