प्रभासने केले शाहिदचे कौतुक, म्हणाला...

    दिनांक :18-May-2019
आगामी ‘कबीर सिंग’ चित्रपटाचा ट्रेलर बघून दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास चांगलाच प्रभावित झाला आहे. ट्रेलरमधील शाहिद कपूरच्या भूमिकेचे त्याने विशेष कौतुक केले. शाहिदची प्रमुख भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे.’अर्जुन रेड्डी’ या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. शाहिद या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल की नाही हे बघण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
 

 
‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच प्रसंगी शाहीदही प्रभासचे कौतुक करत म्हणाला की, “प्रभास ट्रेलर बघून खूपच प्रभावित झाला आहे. त्याच्याकडुन कौतुक ऐकून मला खूप छान वाटले. प्रभासने मला असाही सांगितले की, ‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक असला तरीसुद्धा हे दोन्ही चित्रपट अगदीच सारखे नाहीयेत ही चांगली बाब आहे.आम्ही हिंदीत हा चित्रपट करत असल्यामुळे आमचा बहुतांश प्रेक्षकवर्ग हा उत्तर भारतीय असणार आहे. प्रभासकडून झालेलं कौतुक मला बळ देणारं आहे.”