अक्षय कुमार दिसणार ट्रान्सजेंडर भूताच्या भूमिकेत !

    दिनांक :18-May-2019
बॉलिवूडचा दमदार अभिनेता अक्षय कुमार लवकरच एका हॉरर कॉमे डी चित्रपटात दिसणार आहे. ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने  त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटात अक्षयसोबत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहे.
 
 

 
 
या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ५ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खिलाडी कुमार हा एक असा अभिनेता आहे ज्याने आतापर्यंत अॅक्शन, विनोदी, गंभीर, प्रेमकथा अशा प्रत्येक धाटणीच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्याचे हे वेगवेगळे प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील अक्षयची भूमिका अत्यंत वेगळी आहे हे पोस्टर पाहूनच लक्षात येते. हा लूक पाहून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.