शाहरुख खान माझ्यासाठी स्पेशल : अनन्या पांडे

    दिनांक :18-May-2019
बॉलिवूडचा बादशाह म्हणून शाहरुख खानला लोक ओळखतात. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला शाहरुख खान तिच्या वडिलांप्रमाणे वाटतो. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.
 
 

 
शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि अनन्या पांडे खूप जवळच्या मैत्रिण आहेत. एका मुलाखती दरम्यान अनन्या म्हणाली, बॉलिवूडमध्ये अनेक लोक तिच्या क्लोज आहेत मात्र शाहरुख खान स्पेशल आहे. शाहरुख खान तिला वडिलांच्या ठिकाणी आहे. तिचे वडील चंकी पांडे आणि शाहरुखसुद्धा बेस्ट फ्रेंड आहे.
 

 
 
 
अनन्याने 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मध्ये साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतूक झाले. यानंतर ती लवकरच कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसोबत ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. १९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.