फेडररला योग्यता सिद्ध करण्याची गरज नाही

    दिनांक :18-May-2019
बंगळुरू,
 
रॉजर फेडररला कोणाच्याही समोर आपली योग्यता सिद्ध करून दाखविण्याची गरज नाही. यंदाच्या मोसमात फेडररला क्ले कोर्टवरील एकही विजेतेपद पटकावता आले नसले तरी त्यांनी आगामी फ्रेंच ओपनसारख्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतच तो याचे उत्तर देऊ शकेल. या स्पर्धेतील पहिले काही सामने त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे व यानंतरच तो पुन्हा फॉर्ममध्ये त आपले विजेतेपद कायम राखेल, असे अरांचा सांचेझ व्हिक्टोरिया म्हणाली.
 

 
 
 
अरांचा सांचेझ ही माजी प्रथम विश्वमानांकित टेनिसपटू असून 80 व 90च्या दशकात ती लढवय्या टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध होती. तिने जर्मनीची महान टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला आव्हान दिले होते. 1995 व 1996 साली अरांचा सांचेझला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दोनवेळा उपविजेतेपद मिळाले होते. अंतिम सामन्यात तिला अरांचा सांजेझ व्हिक्टोरियाला स्टेफी ग्राफकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.