शंखाची उत्पत्ती भाग- २

    दिनांक :18-May-2019
शंख पूजा कशी करावी
कासवाकृती अडणीवरील शंख कसा ठेवायचा असतो? कासवाचे मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा?
शंखाचा निमुळता चोचीसारखा / पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा. तो देवपूजेकरता घेऊ नये. तो निव्वळ शंखध्वनी करण्याकरताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळद-कुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफुले न वाहता, निव्वळ गंधफुल वहावे, शक्यतो पांढरे फुल वहावे.
 
पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये. 
 
 
शिवपूजेत शंखाचे महत्त्व नसणे
शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही, तसेच शिवाला शंखाचे पाणी घालून स्नान घालत नाहीत. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल, तर त्यातील बाणिंलगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही; पण महादेवाची पिंड असलेल्या  बाणलिंगाला शंखोदकाने स्नान घालू नये.
 
शास्त्र : शिविंपडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते. बाणिंलगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.
 
शंखनाद
आरतीच्या वेळी शंखनाद विहित असणे : देवळात महादेवाची पूजा करताना शंखपूजा उक्त नाही. मात्र आरतीपूर्वी शंखनाद विहित आहे आणि अवश्य केला जातो.
शास्त्र : शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर होतोच; शिवाय शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, पिशाच वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.
  
दक्षिणावर्ती शंख
तंत्र क्रियांमध्ये शंख उपयोगात आणला जातो. तंत्र शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्व आहे. या शंखाची विधिव्रत पूजा करून घरामध्ये स्थापना केल्यास विविध प्रकारच्या बाधा नष्ट होतात आणि धनाची कमतरता भासत नाही. दक्षिणावर्ती शंखाचे अनेक लाभ आहेत परंतु हा शंख घरामध्ये ठेवण्यापूर्वी याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे.
 
दक्षिणावर्ती शंखाचे शुद्धीकरण
लाल वस्त्रावर दक्षिणावर्ती शंख ठेवून त्यामध्ये गंगाजल (गंगेचे पाणी) भरावे आणि आसनावर बसून खालील मंत्राचा जप करावा... ॐ श्री लक्ष्मी सहोदराय नम: या मंत्राचा कमीतकमी पाच माळ जप करावा आणि त्यानंतर शंख देवघरात ठेवावा.
 
दक्षिणावर्ती शंख धान्य
भांडारमध्ये ठेवल्याने धान्य, धन भांडारमध्ये ठेवल्याने धन, वस्त्र भांडारमध्ये ठेवल्याने वस्त्रांची कमतरता भासत नाही. शयन कक्षामध्ये (झोपण्याच्या खोलीत) ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो. यामध्ये शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती, वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात. दक्षिणावर्ती शंख असेलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.
 
शंख पूजेचे फळ
साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणार्‌या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.
देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. देवपूजेकरिता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठीदेखील शंखातील पाणी सिंचन केले जाते. दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिकटलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातकेसुद्धा नाहीशी होतात.
 
पांढाराशुभ्र, कांतिमान, गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख अष्टमी किंवा चतुर्दशीस विधिवत पूजनाने आपल्या देव्हार्‍यात किंवा तिजोरीत स्थापन करावा. राज्य, धन, कीर्ती, आयुष्य, शत्रूवर जय, कोर्टकचेर्‍यांमध्ये यश, पती-पत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये शंखपूजन करण्यास सांगितले आहे.
 
पुढीलपैकी एका मंत्राचा 108 वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा ॐ श्री लक्ष्मीसहोदराय नम:।, ॐ श्रीं पयोनिधी जाताय नम:।, ॐ श्रीं दक्षिणावर्तशंखाय नम:। शंखोदकाने अनेक व्याधी नाहीशा होतात, आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंखभस्माचा उपयोग सांगितला आहे. (समाप्त)
(संकलीत)