लाभ गायत्री मंत्राचे

    दिनांक :18-May-2019
गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तीशाली मंत्र मानला जातो. या मंत्रात दैवी शक्ती असते असं मानलं जातं. गायत्री मंत्र वेदांमध्ये लिहिण्यात आला होता. या मंत्राचे शरीरावर भावनिक आणि मानसिक असे दोन्ही परिणाम होतात. गायत्री मंत्राच्या लाभांविषयी जाणून घेऊ... 

 
 
गायत्री मंत्रात चमत्कारिक शक्ती असल्याचं मानलं जातं. देवाची आराधना करताना, त्याची प्रार्थना करताना, ब्रह्मज्ञान मिळवताना, भौतिक सुखासाठी तसंच पैसा मिळवण्यासाठी गायत्री मंत्र म्हटला जातो. दिवसात तीन वेळा गायत्री मंत्र म्हणता येतो. हा मंत्र म्हणण्याच्या ठराविक वेळा आहेत. त्यापैकी एक म्हणजे संध्याकाल. तसंच सूर्योदयाआधी आणि सूर्य उगवेपर्यंत हा मंत्र म्हणता येतो.
 • या वेळांव्यतिरिक्त इतर वेळी मंत्र म्हणता येतो. पण मन शांत असताना अगदी हळू आवाजात हा मंत्र म्हणायचा असतो. हा मंत्र मोठ्या आवाजात म्हणू नये.
 • या मंत्राच्या उच्चारामुळे माणसात भक्तीभाव विकसित होतो. ठराविक अध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर देव तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो.
 • मनातल्या वाईट विचारांमुळे, नकारात्मक भावनेमुळे लोक आजारी पडतात. गायत्री मंत्राच्या उच्चाराने या वाईट भावना दूर सारल्या जातात आणि माणसाची तंदुरूस्ती कायम राहते.
 • गायत्री मंत्र नियमितपणे म्हटल्याने पुढच्या पिढ्यांना लाभ होतो. पुढच्या पिढ्या बुद्धीवान निपजतात.
 • गायत्री मंत्रामुळे शांत, आनंदी कुटुंबाची खूप भरभराट होते. प्रचंड पैसा असूनही साधेपणा जपणार्‍या लोकांना गायत्री मंत्रामुळे अनेक लाभ होतात.
 • गायत्री मंत्र प्रत्येकासाठी लाभदायी मानला जात असला तरी लहान मुलांना याचे अनेक लाभ होतात. या मंत्राचं दररोज 108 वेळा पठण केल्यास मुलांच्या मेंदूचा विकास होतो. स्मरणशक्ती सुधारते आणि आयुष्यात जे हवं ते मिळतं.
 • शत्रूंमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर दर मंगळवारी, शनिवारी आणि अमावस्येला या मंत्राचं पठण करा. यावेळी लाल कपडे परिधान करा. गायत्री मंत्र म्हणताना दुर्गा देवीचं स्मरण करा. यामुळे सगळ्या समस्यांचं निराकरण होऊ शकेल.
 • लग्न ठरत नसेल तर दर सोमवारी हा मंत्र 108 वेळा म्हणा. यावेळी पिवळी वस्त्रं परिधान करा. देवी पार्वतीचं स्मरण करा. तुम्हाला सुयोग्य जोडीदार मिळेल.
 • जुनाट आणि गंभीर विकारांपासून सुटका हवी असेल तर मंगल दिवशी या मंत्राचं पठण करा. यावेळी पाण्याने भरलेला घडा किंवा तांब्या जवळ ठेवा. मंत्र म्हणताना लाल कापड अंथरून त्यावर बसा. मंत्र म्हटल्यानंतर तांब्यातलं पाणी पिऊन टाका.
 • गायत्री मंत्राच्या नियमित पठणामुळे तुुमच्या चेहर्‍यावर तेज येतं. त्वचा चमकदार दिसते.
 • गायत्री मंत्रामुळे उत्तम आरोग्य राखता येतं. मंत्राच्या नियमित पठणामुळे जंक फूड किंवा अनारोग्यदायी पदार्थांवरून वासना उडते आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं.
 • डोळ्यांशी संबंधित विकार असतील तर गायत्री मंत्राचं पठण लाभदायी ठरू शकतं. यामुळे दृष्टीदोष दूर होतात.