' सांबा'च्या मुली करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

    दिनांक :18-May-2019
‘शोले’ या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत इतिहास घडवला. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर छाप पाडली. चित्रपटातील ‘अरे ओ सांबा.. कितने आदमी थे?’ हा गब्बर सिंगचा डायलॉग तर आजही अनेकांच्या तोंडी आहे. यामध्ये सांबाची भूमिका साकारली होती अभिनेते मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन यांनी. आता मॅक मोहन यांच्या मुली बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
 
 

 
 
 
 
 
 
मॅक मोहन यांच्या मंजरी आणि विनती या दोन मुली स्केटबोर्डिंगवर आधारित बॉलिवूडच्या चित्रपटात दिसणार आहे. ‘डेजर्ट डॉल्फीन’ असं या चित्रपटाचं नाव आहे. मंजरी लेखिकी-दिग्दर्शिका आहे तर विनती सहलेखिका आणि निर्माती आहे. मंजरी आणि विनती त्यांच्या या चित्रपटातून महिला सशक्तीकरणाचा संदेश देणार आहेत.