दहशतवादविरोधी लढ्यात भारताचे श्रीलंकेला सहकार्य

    दिनांक :18-May-2019
कोलंबो, 
11 भारतीयांसह 260 नागरिकांचा बळी घेणार्‍या ईस्टर संडे साखळी बॉम्बस्फोट मालिकेच्या अनुषंगाने जिहादी दहशतवादाचा धोका कायमचा नष्ट करण्यासाठी श्रीलंकेला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी भारताने दर्शवली आहे.
 
 

 
 
 
 
जिहादी दहशतवाद ही भारत आणि श्रीलंकेची समान समस्या आहे आणि ही समस्या हाताळण्याचा भारताचा अनुभव श्रीलंकेच्या उपयोगात येऊ शकतो, अशी भूमिका श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त तरणजितिंसग संधू यांनी एका निवेदनातून विशद केली.
ईस्टर संडे स्फोटमालिकेनंतर श्रीलंकेच्या विविध भागांमध्ये दररोजच हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यामुळे स्थिती तणावपूर्ण झाली आहे. ही चिंतेची बाब असून, श्रीलंकेचा शेजारील मित्रराष्ट्र या नात्याने भारत या देशाला आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.