विराटच्या नेतृत्वाखाली खेळणे ही मानाची गोष्ट : भुवनेश्वर कुमार

    दिनांक :18-May-2019
विश्वचषक स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमार हा भारतीय गोलंदाजीचा प्रमुख हिस्सा मानला जातो आहे. विश्वचषकात भारतीय चाहत्यांना आणि कर्णधार विराट कोहलीला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. भुवनेश्वर कुमारनेही आगामी विश्वचषक स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली खेळणे ही मानाची गोष्ट असल्याचे म्हणत आपल्या कर्णधाराचे कौतुक केले  आहे.
 
 
 

 
 
 
“विराटच्या नेतृत्वाखाली खेळणे ही निर्विवादपणे एक मानाची गोष्ट आहे. तो आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे. तो प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात काय सुरु आहे हे ओळखतो. तो मैदानात नेहमी आक्रमक असतो. एक गोलंदाज म्हणून अशा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणे हा माझा बहुमान आहे. विराटच्या नेतृत्वाखाली आमचा संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल याची मला खात्री आहे.” भुवनेश्वर कुमार एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होता.