भारतीय संघाला मोठा दिलासा; केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त

    दिनांक :18-May-2019
३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. मधल्या फळीतला भारताचा महत्वाचा खेळाडू केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त ठरला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत असताना पंजाबविरुद्ध सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर केदारने आयपीएलमधून माघारही घेतली होती.
 

 
 
 
मात्र टीम इंडियाचे फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फरहात यांनी केदारची दुखापत फारशी गंभीर नसून तो विश्वचषकाआधी बरा होईल असे म्हटले होते. त्यानुसार केदारच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पॅट्रीक फरहात यांनी बीसीसीआयला आपला अहवाल सादर केल्याचे कळतंय. यामुळे केदार जाधव टीम इंडियासोबत २२ मे ला इंग्लंडसाठी रवाना होऊ शकणार आहे.
 
 

 
 
 
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केदार काही दिवस वास्तव्याला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येखील प्रशिक्षण केंद्रात केदारने पॅट्रीक फरहात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी फिटनेस टेस्ट पास करत विश्वचषकासाठी आपलं नाव पक्क केले. केदारच्या अनुपस्थितीत अंबाती रायुडू-अक्षर पटेल यांची नाव चर्चेत होती.