मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी 78 कोटी डॉलर्स

    दिनांक :18-May-2019
वॉशिंग्टन,
अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर िंभत उभारण्यासाठी पेंटॅगॉनने दोन बांधकाम कंपन्यांना मिळून 78 कोटी डॉलर्स दिले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे. अॅरिझोना प्रांतातील टस्कॉन भागातील या िंभतीच्या आरेखनासाठी आणि िंभतीच्या बांधकामासाठी मेक्सिकोतल्या अल्बुकर्क येथील साऊथ ईस्ट व्हॅली या बांधकाम कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे, असे संरक्षण विभागाच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे.
 
 
 
याशिवाय बीएफबीसी एलएलसी या कंपनीलाही अल सेंट्रो आणि युमा या शहरांदरम्यान िंभत बांधण्याच्या कामासाठी कंत्राट देण्यात आले आहे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील चार सीमांवर अशाप्रकारे िंभत बांधण्याचे संरक्षण विभागाने निश्चित केले आहे. अल सेंट्रो, युमा, टस्कन, अल पासो या शहरांजवळ िंभत बांधण्यात येणार आहे.
 
मागील आठवड्यात पेंटॅगॉनने 80 मैल लांबीच्या िंभतीच्या कामासाठी 1.5 अब्ज डॉलर हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून पेंटॅगॉनने ही मंजुरी दिली. ट्रम्प यांनी 2016च्या निवडणूक प्रचारादरम्यान अशी िंभत बांधण्याचे आश्वासन दिले होते. या िंभतीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यावर ठाम राहून ट्रम्प यांनी फेब्रुवारीत राष्ट्रीय आणिबाणी घोषित केली होती.