पावसाळ्याआधी मुंबईतील 20 धोकादायक पूल होणार बंद

    दिनांक :18-May-2019
मुंबई,
 
पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांची कोंडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण पावसाळ्यापूर्वी मुंबईतील 20 धोकादायक पूल बंद करण्यात येणार आहेत. सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या ऑडिटमध्ये मुंबईतील 14 पूल धोकादायक ठरवण्यात आले आहेत.

 
 
 
 
या धोकादायक पुलांमध्ये मरिन लाईन्सजवळील पुलांचाही समावेश होता. त्यात आता उरलेल्या पुलांमध्ये जुहू ताराजवळील पूल, मेघवाडी नाल्याजवळील पूल, वांद्रे-धारावी नाल्याजवळील पुलांचा समावेश आहे. एकूण 8 पूल बंद ठेवून तोडण्यात आले आहेत. आता उरलेल्या पुलांवरही लवकरच  दुरुस्ती किंवा हातोडा पडणार आहे.