न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी विद्यार्थिनीची लाच नाकारली!

    दिनांक :18-May-2019
वेिंलग्टन,
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेिंसडा आर्डर्न यांनी 11 वर्षीय विद्यार्थिनीने पाठवलेली लाच नाकारली. ड्रॅगनबाबत संशोधन करण्याची बालसुलभ मागणी करीत या चिमुरडीने नाममात्र रक्कम पाठवली होती. ड्रॅगनबाबत संशोधन करण्यासाठी आपल्याला टेलिकायनेटिक म्हणजेच अंतर्मनाच्या शक्तीने वस्तू हलवण्याची क्षमता प्रदान करावी, अशी अजब मागणी व्हिक्टोरिया नावाच्या विद्यार्थिनीने पत्रातून केली होती. पत्रासोबत तिने पाच न्यूझीलंड डॉलर (सुमारे 230 रुपये) पाठवले होते.
 

 
 
तुझ्या सूचना ऐकून आम्हाला कुतूहल वाटले. मात्र, आम्ही याबाबत कोणतेही संशोधन कार्य करीत नाही. तू पाठवलेली लाच परत करीत आहे. भविष्यात संशोधन करण्यासाठी तुला शुभेच्छा, अशा आशयाचे उत्तर जेिंसडा यांनी आपल्या हस्ताक्षरात तिला पाठवले. विशेष म्हणजे, या चिमुरडीच्या बालसुलभ कुतूहलाला धक्का पोहचणार नाही, याची पुरेपूर काळजीही आर्डर्न यांनी घेतली. पत्राखाली ताजा कलम लिहिताना, मी त्या ड्रॅगनवर डोळा ठेवून असेन, ते सूट घालतात का? असा प्रश्न आर्डर्न यांनी विचारला. दरम्यान, नेटफ्लिक्सवरील एका विज्ञानविषयक मालिकेमुळे व्हिक्टोरियाला या विषयात रस निर्माण झाल्याचे तिच्या मोठ्या भावाने सांगितले.