विश्वचषकासाठी BCCI ने टीम इंडियाला दिला 'हा' सल्ला

    दिनांक :18-May-2019
 भारतीय खेळाडू नुकतेच आयपीएलचा बारावा हंगाम संपवून मोकळे झाले आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय खेळाडूंवर अतिक्रिकेटचा ताण येत होता. यावर उपाय म्हणून बीसीसीआयने विश्वचषकाआधीच्या मालिकांमध्ये महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. आता आगामी विश्वचषकासाठी BCCI ने टीम इंडियाच्या खेळाडूंना एक आगळावेगळा सल्ला दिला आहे. आयपीएल संपल्यानंतर खेळाडूंना तात्काळ सरावाला न सुरुवात करता आराम करावा असा संदेश खेळाडूंना देण्यात आला आहे.
 
 
 

 
 
 
 
२२ मे रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. मात्र त्याआधी खेळाडूंनी स्वतःला सरावामध्ये न जुंपता आपल्या परिवारासोबत वेळ घालवावा, फिरायला जावं आणि २१ मे रोजी मुंबईत सकारात्मक मन आणि विचाराने परत यावं असा संदेश खेळाडूंना देण्यात आला आहे.