पाकिस्तानातील एका गावात 400वर मुले एचआयव्हीग्रस्त

    दिनांक :18-May-2019
इस्लामाबाद,
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका गावात एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत 434 मुले आणि 103 प्रौढ नागरिक एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.
 
 
 
याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना आज शनिवारी या मोहिमेचे प्रमुख सिकंदर मेमन म्हणाले, रातोदेरो गावात 15 हजार 200 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात 434 मुले आणि 103 प्रौढ नागरिक एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळले आहेत. इंजेक्शनच्या सिरिंजचा फेरवापर झाल्यामुळे हा प्रसार झाल्याची शक्यता 60 टक्के आहे. ही संख्या मोठी आहे. केवळ डॉक्टरांच्या दुर्लक्षानेच हा प्रकार घडला आहे. यात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, गावातील स्थानिक डॉक्टरला याप्रकरणी अटक झाली असून, तो स्वत:ही एचआयव्हीग्रस्त आहे. त्याने मात्र, आपण निरपराध असल्याचा दावा केला आहे.