सशाच्या कलाकृतीने कायम केला रेकॉर्ड !

    दिनांक :18-May-2019
जगभरात वेगवेगळ्या कलाकृतीं विश्वासही बसणार नाही इतक्या किंमतीत खरेदी केल्या जातात. आता अशीच एक सशाची कलाकृती विकली गेली असून या कलाकृतीने रेकॉर्ड कायम केला आहे. बघायला भलेही ही सशाची कलाकृती तुम्हाला सामान्य वाटत असेल, पण या कलाकृतीने लिलावात रेकॉर्ड कायम केला आहे. या कलाकृतीला ९१.१ मिलियन डॉलर म्हणजेच ६३७ कोटी रूपयांना विकली गेली आहे.
 
 
अमेरिकन कलाकार जेफ कूंस यांनी ही रॅबिटची कलाकृती स्टीलपासून तयार केली. मागचे सगळे रेकॉर्ड्स तोडत या कलाकृतीने सर्वात महागडी कलाकृती होण्याचा रेकॉर्ड कायम केला आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, लिलावात बुधवारी सायंकाळी केवळ ३ फूट उंच या कलाकृतीवर बोली लावली गेली होती. चेहरा नसलेल्या या रॅबिटची किंमत अंदाजे ५ ते ७ कोटी लावण्यात आली होती. पण ही बोली ८ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली. तर शेवटी ही कलाकृती ९१,०७५,००० डॉलरला विकली गेली. मूर्तीमध्ये सशाच्या हाती एक गाजरासारखी वस्तू आहे.
बुधवारी लिलावाच्या आधी या कलाकृतीला २०व्या शतकातील कलेची सर्वात प्रतिष्ठित कलाकृती केले गेले होते. वेबसाइटवर याचा प्रिव्ह्यू सुद्धा दाखवण्यात आला होता. चेहरा नसल्याने ही कलाकृती रहस्यमयी ठरते.  एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, ही कलाकृती आर्ट डीलर रॉबर्ट मनूचिनने खरेदी केली.