रोनित रॉय दिसणार 'या' मालिकेत!

    दिनांक :18-May-2019
‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ या मालिकेत रोनित रॉयने मिस्टर. बजाज ची भूमिका साकारली होती. त्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. या भूमिकेने रोनित रॉयच्या करिअरला यशाच्या शिखरावर नेले. आता या नव्या मालिकेत मिस्टर. बजाज या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यासाठी रोनित रॉय एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
 

 
 
 
मालिकेशी संबंधित सूत्रांनी सांगितले, “मिस्टर. बजाज यांची व्यक्तिरेखा ही या मालिकेतील एक मध्यवर्ती भूमिका असून पूर्वी रोनित रॉयने ती अतिशय अचूकतेने उभी केली होती. आता या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यासाठी रोनित रॉयने या मालिकेत एखादी छोटीशी भूमिका साकारावी, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. तो जर मालिकेत दिसला, तर प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पूर्वीच्या स्मृती जाग्या होतील.”
‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत पुन्हा एकदा रोनित रॉय दिसला, तर त्याला पाहणे फारच मनोरंजक होईल.