दूचाकीची बैल बंडीला धडक;दुचाकीचालकासह बैलाचा मृत्यू

    दिनांक :18-May-2019
वर्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर अपघात
 
समुद्रपुर: तालुक्यातिल वर्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर रात्री १० वाजताच्या सुमारास वरोरा कडे जात असलेल्या बैलबंडीला दुचाकीने जबर धडक दिलीय.यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे.धडक इतकी भीषण होती की बैलबंडीचा एक बैल जागीच मरण पावला.अश्विन पाटील अस मृतकांच नाव आहे तर सुशील कडू हा गंभीर जखमी आहे दोघेही वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सेलुमुरपार येथील रहिवासी. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भरत क-हाडे, पोलिस कर्मचाऱ्यांरी कांचन नवाते, सुनिल भगत,गजानन राउत,विनोद थाटे,प्रविण चव्हान,दिपक जाधव आदीनी घटनास्थळ गाठत जखमीला रुग्णालयात पाठवले.