टुनकी येथे दोन सराफा व्यवसाईकांमध्ये हानामारी, परस्परांवर अ‍ॅसिड हल्ला, चार जण जखमी

    दिनांक :18-May-2019
संग्रामपूर (बुलडाणा): तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफा व्यावसाईकांमध्ये ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एकमेकांवर अ‍ॅॅसिड फेकण्यात आल्याने चौघे जण जखमी झाले.ही घटना आज दुपारच्या दरम्यान घडली आहे.
संग्रामपुर तालुक्यातील टुनकी येथे गावात सराफा व्यवसाय करणारे संजय शिंगणापुरे, शुभम शिंगणापुरे आणि सुधीर पिंजरकर, राहूल पिंजरकर यांच्यात ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटाकडील मंडळी आमने-सामने आली. भांडणादरम्यान एकमेकांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्यात आले.
 

 
 
यात संजय शिंगणापुरे यांचा हात भाजला असून शुभम शिगणापुरे याला अंगावर अ‍ॅसिड डलेले आहे. यात  एकूण चारही जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती सोनाळा पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चौघांनाही वैद्यकीय उपचारासाठी शेगाव येथे सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आणि संजय शिगणापुरे यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे .मेडिकल रिपोर्टवरून पोलीस कारवाई करनार असल्याची माहिती आली आहे.
याबाबत वुत्त लिहेपर्यत सोनाळा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाले नसून सोनाळा पो स्टे चे ठाणेदार अमर चोरे तपास करत आहे.