गोल्डन स्टेटच्या विजयात स्टीफन करी चमकला

    दिनांक :18-May-2019
न्यू यॉर्क,
 
स्टीफन करीच्या शानदार 37 गुणांच्या जोरावर गोल्डन स्टेट वॉरियर्सने जोरदार मुसंडी मारत एनबीए वेस्टर्न कॉन्फरन्स फायनल्स मालिकेतील बास्केटबॉल सामनत पोर्टलॅण्ड ट्रेल ब्लेझर्स संघावर 114-111 असा अवघ्या तीन गुणांच्या फरकाने रोमांचक विजय नोंदविला.
 

 
 
 
स्टीफन करीने उत्स्फूर्त खेळाचे प्रदर्शन करत गोल्डन स्टेटला चुरशीचा सामना संपायला चार मिनिटे शिल्लक असताना 108-100 अशी आघाडी मिळवून दिली होती. दुसर्‍या चरणात ट्रेल ब्लेझर्सने आपल्या गुणसंख्येत 17 गुणांची वाढ केली. त्यानंतर गोल्डन स्टेटने 39 गुण गमावले. मात्र पोर्टलॅण्ड ट्रेल ब्लेझर्सचा कर्णधार डॅमियन लिलार्डला सामन्यावर नियंत्रण राखता आले नाही आणि स्टीफन करी तेवढ्याच स्फूर्तीने खेळला व आपल्या गोल्डन स्टेटला 111-110 असे आघाडीवर नेले. दुखापतग्रस्त  केव्हिन दुरांतच्या अनुपस्थितीत स्टीफन करीने अफलातून प्रदर्शन केले.