होंडूरासमध्ये विमान अपघातात चार जणांचा मृत्यू

    दिनांक :19-May-2019
तेगूसिंगल्या, 
होंडूरासच्या रोआतन बंदराजवळील समुद्रात एक विमानाचा अपघात झाल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला. त्यातील तीन नागरिक पर्यटनासाठी आले होते. 

 
 
हे विमान बंदरावरील हवाई तळावरून उड्‌डाण भरल्यानंतर काही मिनिटांतच समुद्रात कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हे विमान रोआतनहून 77 किलोमीटर अंतरावरील तरुजिलो या शहरी जाणार होते.