शिवराज्याभिषेक सोहळ्यास देशोदेशीचे राजदूत येणार

    दिनांक :19-May-2019
 पुणे: शिवराज्यभिषेक सोहळा जगभरात पोहचण्यासाठी विविध देशांच्या राजदूतांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे देण्यात आली. हा सोहळा 6 जून रोजी किल्ले रायगड येथे होत आहे.
 

 
 
शिवराज्यभिषेक सोहळा समिती 5 व 6 जून रोजी रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याच्या पूर्वतयारीविषयी पुण्यात शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत खासदार छत्रपती संभाजीराजे, युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, राजेंद्र कोंढरे, समितीचे अध्यक्ष फत्तेिंसह सावंत, समितीचे सदस्य धनंजय जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, महादरवाज्यात कोंडी होऊ नये, यासाठी समितीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. कोंडी टाळण्यासाठी नाना दरवाजा येथील मार्ग गड उतरण्यासाठी आणि चित्त दरवाजा येथील मार्ग गड चढण्यासाठी वापरण्यात येणार आहे.